Maharashtra sarkari Yojana 2024:महाराष्ट्र सरकारी योजना 2024 मधील योजनांची यादी

Maharashtra Sarkari Yojana 2024: मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सरकारच्या 2024 मध्ये ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचे आपण माहिती बघणार आहोत. तुम्हाला जर सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हे आर्टिकल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. यासाठी खाली दिलेली माहिती तुम्ही वाचा त्यामुळे तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मदत मिळेल.

महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये राज्यातील नागरिकांसाठी व त्यांना मदत करण्यासाठी काही महत्त्वाच्या योजना सुरू केलेले आहेत व तसेच या योजनांचा लाभ घेतल्यामुळे नागरिकांचा विकास होण्यास मदत होते व नागरिकांना आर्थिक साह्य कोणत्या पद्धतीने केली जाईल याबद्दल चर्चा करण्यात आली आहे.

2024 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून बजेट मांडण्यात आले होते त्या बजेटमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचा विचार करून बजेट तयार करण्यात आले आहे. या बजेटनुसार सरकारने खुप सार्‍या योजनांवर लाखो रुपये गुंतवणूक केली आहे व या योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा व त्यांना यातून फायदा होणार आहे. सरकारी योजनांच्या Maharashtra sarkari Yojana 2024 अनुदानामुळे बहुसंख्य लोकांना अनेक प्रकारची मदत मिळणार आहे.

महाराष्ट्र सरकार योजना 2024 चे मुख्य घटक

योजनेचे नाव Maharashtra sarkari Yojana 2024  संपूर्ण यादी
योजना देणारे चे नाव महाराष्ट्र सरकार
योजना राबवणार जाणारे राज्य महाराष्ट्र
योजनेचा उद्दिष्ट नागरिकांना आर्थिक सहाय्य देणे व मदत करणे तसेच त्यांचा आर्थिक व संपूर्ण विकास करणे
लाभार्थी कोण असणार महाराष्ट्र राज्यातील नागरिक
योजनेचा फायदा राज्यातील नागरिकांना आर्थिक सहाय्य करून देणे
योजना सुरू असलेले वर्ष 2024

 

महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी व त्यांच्या कल्याणासाठी 2024 मध्ये विविध योजना राबवले आहेत व या योजना विविध विभागामार्फत राबवल्या जाणार आहेत व तसेच त्यांची कार्यप्रणाली ही विभिन्न असते व प्रत्येक योजनेचे पात्रता निकष व फायदे ही वेगवेगळे असतात. महाराष्ट्र राज्यात राबवल्या जाणाऱ्या 2024 मधील विविध योजनांची माहिती खाली दिली आहे.

वयोश्री योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री

ज्या नागरिकांचे वय 65 वर्ष पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने वयोश्री योजना राबवली आहे. या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत. जे ज्येष्ठ नागरिक आहेत व त्यांना अपंगत्व आहे अशा नागरिकांना सरकारतर्फे त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या सर्व साधनांचा पुरवठा मोफत करण्यात येणार आहे यामध्ये नागरिकांना व्हीलचेअर संडासचे भांडे श्रवण यंत्र चष्मा तसेच अंध व्यक्तीसाठी काठी यासारख्या साधनांचा वाटप सरकारतर्फे करण्यात येणार आहे. आपल्याला जर यासंबंधी अधिक माहिती पाहिजे असेल तर येथे क्लिक करा.

Maharashtra Sarkari Yojana 2024
Maharashtra Sarkari Yojana 2024

महाडीबीटी शेतकरी योजना

महाडीबीटी शेतकरी योजना ही प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी तयार केली गेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी व शेतीसाठी लागणारे आधुनिक यंत्रे त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विकासासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी सरकारने एक खास महाडीबीटी पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या योजना पाहता येतात व त्यांना त्यावर नोंदणी करून त्या योजनेचा लाभ घेता येतो. महाडीबीटी पोर्टल वरील योजना पाह ण्यासाठी येथे क्लिक करा.

Also Read This : Udyogini Scheme 2024:महिलांसाठी सुवर्णसंधी बिनव्याजी कर्ज आणि 30% अनुदान

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

राज्यातील बेरोजगार नागरिकांना रोजगार मिळण्यासाठी व त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी शासनाने रोजगार संगम योजना चालू केली आहे. जे नागरिक संपूर्णपणे बेरोजगार आहेत अशा लोकांसाठी ही योजना लाभदायी आहे व या योजनांमध्ये पात्र असलेल्या व्यक्तीस पाच हजार रुपयाची आर्थिक मदत सरकार करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना

राज्यातील जे लोक पूर्णपणे बिगर आहेत व ज्यांना स्वतःचा असा निवारण आहे अशा लोकांसाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना चालू केली आहे. जे नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा लोकांना या योजनेतर्फे घर बांधण्यासाठी सरकारतर्फे अनुदान दिले जाते. घर बांधण्यासाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेमध्ये किती रुपये दिले जातात व अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

महाडीबीटी पोर्टल स्कॉलरशिप योजना

विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक सहाय्य मिळावे व त्यांना शिक्षणात कोणताही आर्थिक अडथळा नको यासाठी सरकारने या योजनेची स्थापना केली आहे. या योजनेसाठी सरकारने काही निकष ठरवलेले आहेत व जे या निकषांमध्ये बसतात अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेची व कॉलेजचे पैसे भरताना त्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेमध्ये वेगवेगळ्या जातीनुसार वेगवेगळे शुल्क दिले जाते व तसेच या योजने त तो विद्यार्थी बसतो का हेही पाहिले जाते अधिक माहितीसाठी आपण येथे क्लिक करा.

निपुण भारत योजना

सरकारने प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास तो संपूर्णपणे साक्षरता प्राप्त व्हावा यासाठी ही योजना चालू केली आहे. राज्यातील प्रत्येक विद्यार्थी पूर्णपणे साक्षर व्हावा असा या योजनेचा हेतू आहे या योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करा.

लेक लाडकी योजना

सरकारने खास मुलींसाठी ही योजना चालू केली आहे. मुलींच्या जन्मदरात वाढ करणे व तसेच त्यांच्याबाबत सकारात्मकता तयार करणे हा या योजनेचा हेतू आहे. मुलींचे संपूर्ण प्राथमिक शिक्षण या योजनेमध्ये मोफत केली आहे. तसेच मुलींना पहिलीपासून ते बारावी पर्यंत संपूर्ण शिक्षणासाठी काही रिका अनुदानित केली आहे. मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बँकेच्या खात्यात 75 हजार रुपये सरकार मार्फत दिले जाणार आहेत. जर आपल्याला या योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही येथे क्लिक करा.

Maharashtra sarkari Yojana 2024
Maharashtra Sarkari Yojana 2024

माझी शाळा सुंदर शाळा अभियान

महाराष्ट्र राज्यातील जसा व प्राथमिक शाळा आहेत त्यांचा विकास व्हावा व तसेच त्यांचे शिक्षण चा दर्जा वाढावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने ही योजना राबवली आहे या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिक विद्यार्थी शिक्षक सहभागी होऊ शकतो तसेच या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक शाळांना आयएसओ सर्टिफिकेटची मान्यता देण्यात आली आहे तुम्हाला जर या योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही येथे क्लिक करू शकता

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना महाराष्ट्र

या योजनेमध्ये जे लोक बेघर आहेत ओजी बेरोजगार आहेत अशा नागरिकांना त्यांना स्वतःच्या हक्काचे घर बांधून दिले जाण्याचे काम या योजनेद्वारे केले जाते. तसेच या योजनेमध्ये घरांबरोबर शौचालय बांधण्याचे आर्थिक सहाय्य दिली जाते. तुम्हाला जर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना बद्दल अधिक माहिती काय आहे असेल तर तुम्ही येथे क्लिक करू शकता.

बाल संगोपन योजना महाराष्ट्र

राज्यातील जे लोक आर्थिक दृष्ट्या बरोबर आहेत व जे बेरोजगार आहेत अशा घरात जन्म घेतलेल्या बालकाचे आर्थिक संगोपन चांगले व्हावे व त्याला शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी बाल संगोपन योजना ही महाराष्ट्र सरकारने चालू केली आहे. बालकाचे आरोग्य संपूर्णपणे निरोगी राहण्यासाठी तसेच कुपोषित दर कमी करण्यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल व या योजनेमध्ये नोंद करायचे असेल तर तुम्ही येथे क्लिक करू शकता.

अपंग पेन्शन योजना

राज्यातील जे लोक अपंग आहेत व त्यांना आर्थिक सहाय्य प्राप्त करून देणे व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून देणे यासाठी अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली आहे या योजनेमध्ये पात्र होणाऱ्या नागरिकांना अनेक प्रकारच्या सुविधा सरकार तर्फे पुरवल्या जातात तुम्हालाही या योजनेची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही येथे क्लिक करू शकता.

विहीर अनुदान योजना

राज्यातील ज्या भागात शेतीसाठी पाणीपुरवठा उपलब्ध नाही त्या भागातील लोकांसाठी विहीर अनुदान योजना राबवली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतासाठी त्यांच्या हक्काचे पाणी मिळून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते व त्यांचे जीवन पद्धतीत बदल होतो जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही येथे क्लिक करू शकता.

Maharashtra Sarkari Yojana 2024
Maharashtra Sarkari Yojana 2024

मागेल त्याला शेततळे योजना

शेतकरी वर्गातील पाण्याची टंचाई एक अत्यंत महत्त्वाची समस्या आहे ही समस्या दूर करणे यासाठी सरकारने मागील त्याला शेततळे ही योजना राबवली आहे. जे शेतकरी या योजनेला पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना अत्यंत कमी खर्चात क्षेत्र उपलब्ध करून दिले जाते.शेततळे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्या ला पाहिजे ते पीक कधीही घेऊ शकतो ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना ठरत आहे. जर कोणत्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असो व या योजनेसाठी काय निकष आहेत त्यासाठी तो शेतकरी यासंबंधीची अधिक माहिती पाहण्यासाठी त्याने येथे क्लिक करावे.

ट्रॅक्टर अनुदान योजना

राज्यातील शेतकऱ्याचे कष्ट कमी व्हावे व मुक्या जनावरांचे हाल कमी व्हावे तसेच अत्याधुनिक यंत्रांचा वापर व्हावा यासाठी सरकारने ट्रॅक्टर अनुदान योजना राबवली आहे. या योजनेमध्ये जे शेतकरी पात्र होतात त्या शेतकऱ्यांसाठी काही ठराविक अनुदान दिले जाते त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य मिळते. या योजनेबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही येथे क्लिक करा.

निष्कर्ष Maharashtra sarkari Yojana 2024 

आम्हाला या लेखांमध्ये शेतकऱ्यांना कोणत्या योजना राबवल्या आहेत याबद्दलची माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असेल व महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये कोणत्या योजना आणले आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी ही आमची अपेक्षा होती ती तुम्हाला मिळाली असेल. तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली त्याबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा.

FAQs Maharashtra Sarkari Yojana 2024

Q1. पंचायत समिती विहीर योजना काय आहे ?

Ans. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये खोदण्यासाठी सरकारतर्फे चार लाख रुपये पर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळू शकते.

Q2. महाडीबीटी पोर्टल काय आहे ?

Ans. महाडीबीटी पोर्टल मध्ये शेतकरी त्यांच्या विविध योजनांना अर्ज करू शकतात व त्या योजनांसाठी नोंदणी करू शकतात.

Leave a Comment