Pm Vishwakarma Yojana 2024: भारतातील सर्व सामान्य नागरिकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबवली आहे. या योजनेचा मुख्य हेतू देशातील गरीब नागरिकांना आर्थिक साहाय्य करण्यात व त्यांचा विकास करणे . भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी या योजनेची सुरुवात केली. गरीब वर्गातील प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना तयार केली आहे.
आता आपण भारत सरकार राबवलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना यासंबंधीची पूर्ण माहिती घेणार आहोत यासाठी आपण हा लेख पूर्ण वाचावा.
pm vishwakarma yojana 2024 पंतप्रधान विश्वकर्मा श्रम सन्मान योजना काय आहे ?
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही देशातील जे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहेत त्यांच्यासाठी सरकारने योजना राबवली आहे. या योजनेमधील जे कारागीर आणि कामगार आहेत त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे व अत्याधुनिक उपकरण तंत्रज्ञान व जे अत्याधुनिक डिजिटल व्यवहार निघाले आहेत त्यांना प्रोत्साहित करणे.
जो व्यक्ती हा कौशल प्रशिक्षण पूर्ण करतो त्याला प्रमाणपत्र ही दिले जाते. सरकारने 18 व्यवसायांचा या योजनांमध्ये समावेश केला आहे. भारत सरकारने विश्वकर्मा योजनेसाठी 1300 कोटी रुपयांचा बजेट ठरवलेले आहे. जे नागरिक पारंपरिक उपकरणांवर स्वतःचा उदनिर्वाह करतात त्यांना आर्थिक मदत प्राप्त होते. या योजनेवर छोटे व्यवसायिक आहे त्यांना आपल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
विश्वकर्मा योजना 2023 ते 2027 या पाच वर्षाच्या आर्थिक धोरणात लागू केली आहे. ज्या अठरा व्यवसायांचा या योजनेत समावेश केला आहे त्या योजनेमध्ये लोकांना एका आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणा दरम्यान नागरिकाला प्रत्येक दिवशी पाचशे रुपये भत्ता दिला जातो. तसेच नागरिकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 15000 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते तेही आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला तीन लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते तेही कसल्याही आम्ही शिवाय. या योजनेमध्ये जवळपास 140 जातींचा समावेश करण्यात आला आहे व त्या जातीतील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी ते पीएम विषयक वर्मा पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
pm vishwakarma yojana 2024 हायलाइट्स
योजनेचे नाव | प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
लाभार्थी कोण | विश्वकर्मा समाजातील 140 जातींचा समावेश |
योजनेचे उद्देश | व्यवसाय मार्गदर्शन आणि आर्थिक मदत करणे |
योजनेचे एकूण बजेट | 13,000 करोड रुपये |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | Pmvishwakarma.gov.In |
योजना कधी सुरू झाली | 2024 |
कर्जाची एकूण रक्कम | तीन लाख रुपये ,5℅ व्याज |
हे पण वाचा : Maharashtra sarkari Yojana 2024:महाराष्ट्र सरकारी योजना 2024 मधील योजनांची यादी
pm vishwakarma yojana 2024 योजनेची उद्दिष्टे
या योजनेचा मुख्य हेतू देशातील शिल्पकार व कारागी यांचे कौशल्य क्षमता यामध्ये वाढ करणे जेणेकरून त्यांचे देशाच्या प्रगतीत योगदान मिळेल.
तसेच जे लोक पारंपरिक व्यवसायावर आपले पोट चालवतात अशा लोकांना आधुनिक उपकरण चालवणे शिकवणे व आत्ताच्या युगात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहित करणे.
pm vishwakarma yojana 2024 पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे
- या योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 18 व्यवसाय चे एका आठवड्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते.
- प्रशिक्षण करत असताना व्यक्तीला दररोज पाचशे रुपये भत्ता दिला जातो.
- या योजनेमध्ये जे प्रशिक्षण पूर्ण करतात त्यांना पंधरा हजार रुपये प्रशिक्षणाच्या सुरुवातीला दिले जातात व ते आपले आधुनिक उपकरण खरेदी करू शकतात.
- या योजनेअंतर्गत व्यक्तीला तीन लाख रुपये यांचे कर्ज बिना हमीशिवाय दिले जाते यामध्ये पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये दिले जाते आणि ही रक्कम पाच टक्के व्याजदर राहणे देण्यात येते.
- लाभार्थ्याला हे कर्ज 18 महिने किंवा 30 महिन्याच्या कालावधी करतात दिले जाते.
pm vishwakarma yojana 2024 योजनेचा कोणाला मिळणार?
या योजनेमध्ये सुविधा 18 प्रकारच्या व्यवसायांचा समावेश केला गेला आहे. ज्या अठरा प्रकारचे व्यवसाय आहेत ते खालील प्रमाणे दिले गेले आहे
क्रमांक | व्यवसाय |
1 | सुतार |
2 | न्हावी |
3 | मेस्त्री |
4 | कुलुपांचे कारागीर |
5 | सोनार |
6 | कुंभार |
7 | लोहार |
8 | मूर्तिकार |
9 | मोची |
10 | टेलर |
11 | धोबी |
12 | मच्छीमार |
13 | हार बनवणारे |
14 | हातोडा इत्यादी कीट बनविणारे कारागीर |
15 | चटई, झाडू बनवणारे कारागीर |
16 | लहान मुलांची खेळणी बनविणारे कारागीर |
17 | बोट किंवा नाव बनवणारे |
18 | शिल्पकार |
Pm Vishwakarma Yojana 2024 योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्त्वाचे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे दिली गेली आहेत.
कागदपत्राचे नाव | तपशील |
आधार कार्ड | तुमचा 12 अंकी आधार क्रमांक असलेला तुमचा ओळखपत्र |
पॅन कार्ड | तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक असलेला तुमचा कर ओळखपत्र |
उत्पन्न प्रमाणपत्र | तुमचे वार्षिक उत्पन्न दर्शविणारे अधिकृत कागदपत्र |
जात प्रमाणपत्र | तुमची जात दर्शविणारे अधिकृत कागदपत्र |
ओळखपत्र | तुमचा फोटो आणि वैयक्तिक माहिती असलेले वैध ओळखपत्र (जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र) |
पत्त्याचा पुरावा | तुमचा वर्तमान पत्ता दर्शविणारे अधिकृत कागदपत्र (जसे की विद्युत बिल, टेलिफोन बिल) |
पासपोर्ट आकाराचा फोटो | तुमचा स्पष्ट आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो |
बँक पासबुक | तुमचे बँक खाते क्रमांक आणि खाते शिल्लक असलेले तुमचे बँक पासबुक |
मोबाईल नंबर | तुमचा सक्रिय मोबाईल नंबर |
pm vishwakarma yojana 2024 योजनेच्या पात्रता व अटी
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती आहे भारताचा नागरिक असावा.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 पेक्षा जास्त असावी व 50 वर्षापेक्षा कमी असावे.
- पारंपारिक व्यवसाय करत असलेल्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळू शकतो.
- सरकारी सेवेत असलेल्या व्यक्ती व त्याच्या कुटुंब बादल सदस्यांवर चा लाभ मिळणार नाही
- अर्ज करणारे व्यक्तीचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
हे पण वाचा : Udyogini Scheme 2024:महिलांसाठी सुवर्णसंधी बिनव्याजी कर्ज आणि 30% अनुदान
pm vishwakarma yojana 2024 registration ऑनलाईन अर्ज कसा करावा
- यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर वेबसाईट वरील होम पेज ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला नवीन पेजवर तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर टाकून पडताळणी करावी लागेल.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकावा लागेल
- त्यानंतर तुमचा अर्ज ओपन होईल.
- त्यावर तुमचे अचूक माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर योग्य ते सर्व कागदपत्रे तुम्हाला येथे अपलोड करावी लागते.
- त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे.
- सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म भरला गेला आहे असे समजावे.
यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होईल व सर्व कागदपत्रे व माहिती बरोबर असल्यास तुम्हाला pm vishwakarma yojana 2024 योजनेचा लाभ व मुभा दिली जाईल
निष्कर्ष
या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला pm vishwakarma yojana 2024 बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे व या योजनेला कसा अर्ज करायचा याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे व तसेच फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा याबद्दलही सांगितले आहे.
तुम्हाला दिलेली माहिती आवडली असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा.
Pm Vishwakarma Yojana 2024 चे FAQs
प्रश्न : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे?
उत्तर :पीएम विश्वकर्मा ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे जी कारागीर आणि कारागीरांना संपार्श्विक मुक्त क्रेडिट, कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक साधने, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन आणि बाजारासाठी सर्वांगीण आणि शेवटपर्यंत समर्थन प्रदान करण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सुरू केली आहे.
प्रश्न : pm vishwakarma yojana 2024 ची Last Date काय आहे?
उत्तर : PM विश्वकर्मा श्रम सन्मान योजना हि 5 वर्षाच्या कालावधीसाठी आहे म्हणजे 2027/28 पर्यंत आहे . या योजने साठी दिलेला वेळ वाढवून दिला जाऊ शकतो . परंतु सरकारने शेवटीची तारीख अजून जाहीर केली नाही .
प्रश्न : पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा ?
उत्तर : पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो .
प्रश्न : पीएम विश्वकर्माचे प्रमुख वैशिष्टे कोणते आहेत?
उत्तर :पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रमुख वैशिष्टे आहेत:
i ओळख: पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र
ii कौशल्य अपग्रेडेशन
iii टूलकिट प्रोत्साहन
iv क्रेडिट सपोर्ट
v. डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन
vi मार्केटिंग सपोर्ट
प्रश्न :पीएम विश्वकर्माचा लाभार्थी PMEGP साठी अर्ज करू शकतो का?
उत्तर : होय परंतु केवळ पीएम विश्वकर्मा अंतर्गत घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यावर, एखादी व्यक्ती PMEGP चा लाभ घेऊ शकते. आमच्या पारंपारिक कारागिरांना आणि कारागिरांना केवळ पाठिंबाच नाही तर त्यांना पीएमईजीपीचा वापर करून रोजगार निर्माण करणारे बनण्यास सक्षम करण्याचा पंतप्रधान विश्वकर्मा यांचा प्रयत्न आहे.