Udyogini Scheme 2024:महिलांसाठी सुवर्णसंधी बिनव्याजी कर्ज आणि 30% अनुदान

Udyogini Scheme 2024 :कर्नाटक सरकारने 1997-1998 मध्ये केंद्र सरकारच्या मदतीने उद्योगिनी योजना सुरू केली होती पण नंतर ती पूर्ण देशात लागू केली. या योजनेअंतर्गत मध्यम व गरीब वर्गातील महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखापर्यंत लोन दिले जात होते तेही बिना व्याजावर म्हणजे झिरो इंटरेस्टवर आणि या कर्जावर तीस ते पन्नास टक्के पर्यंत सबसिडी ही मिळते.

उद्योगिनी स्कीम चा मुख्य येतो महिलांना आर्थिक सक्षम करणे आणि महिलांना उद्योग प्रदान करणे हा आहे. या योजनेमधील महिलांना एक लाखांपासून ते तीन लाखापर्यंत कर्ज देण्यात येते. पण हे कर्ज देताना सरकार या या महिलांनी अगोदर घेतलेले कर्ज परत केले आहे का नाही हे तपासून घेते. या कर्जावर महिलांना लावले जात नाही पण काही स्थितीत यावर व्याज आकारले जाते. महिलांना आत्मनिर्भर करणे हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यामुळे महिला वर्ग स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनणार आहे.

जर तुम्हाला उद्योगिनी स्कीम बद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा तुम्हाला सर्व माहिती भेटेल.

Udyogini Scheme 2024 चे फायदे

आता आपण उद्योगांनी स्कीम 2024 काही वैशिष्ट्य लाभ पाहणार आहोत जे खालील प्रमाणे दिले आहेत.
1. उद्योगिनी स्कीम भारत सरकारच्या महिला विकास निगम द्वारे देखरेख केली जाते.

2. या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांना एक लाखात पासून ते तीन लाखापर्यंत कर्ज देण्याची मुभा आहे तसेच हे कर्ज कोणते ही वस्तू गहाण न ठेवता देण्यात येते.

3. SC/ST या वर्गातील महिलांना या योजनेअंतर्गत 50 टक्के सबसिडी देण्यात येते व इतर वर्गातील महिलांना 30 टक्के सबसिडी देण्यात येते.

4. या योजनेत मिळणाऱ्या तीन लाख रुपये पर्यंतच्या कर्जात महिला स्वतःचा व्यवसाय करू शकतात उदाहरणार्थ ब्युटी पार्लर टेलरिंगची काम केटरिंग व इतरही व्यवसाय करू शकतात.

5. या योजनेत निवडलेल्या महिलांना ईडीपीद्वारे प्रशिक्षण ही दिले जाते.

6. उद्योगिनी योजना यामुळे वंचित महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनतात व स्वतःचा उद्योग सुरू करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये येते.

Udyogini Scheme 2024

Udyogini Yojana 2024 पात्रता /Eligiblity Criteria

1. या योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा महिला असणे आवश्यक आहे.

2. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे (महिला जर विधवा किंवा निराधार किंवा अपंग असेल तर उत्पन्नावर कोणतेही कमाल मर्यादा नाही).

3. अर्जदार महिलेने पूर्वी कोणत्याही कर्ज बुडवलेले नसावे म्हणजे ते मला डिफॉल्ट लिस्ट मध्ये नसावी.

4. अर्ज करणारी महिला चे वय 18 ते 55 वर्षाच्या दरम्यान असावे.

Udyogini Scheme 2024 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Requird Documents for Udyogini Scheme 2024

उद्योगिनी स्कीम साठी काही कागदपत्रे आवश्यक असतात व अर्ज करताना ती कागदपत्रे जोडणे आवश्यक असतात. या योजनेत लागणारी कागदपत्र खालील प्रमाणे दिली आहेत.
1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड किंवा वोटर आयडी
3. निवासी प्रमाणपत्र
4. कास्ट सर्टिफिकेट (जर SC/ST असाल)
5. ज्या व्यवसायासाठी तुम्ही कर्ज घेणारा आहोत त्यावेळेस यासाठी तुम्ही काही प्रशिक्षण घेतले आहे त्याचे सर्टिफिकेट.
6. तुम्ही जो व्यवसाय करणारा आहात त्याचा पूर्ण तपशील म्हणजेच DPR.
7. व्यवसाय त वापरणाऱ्या मशीन उपकरणे इत्यादींचे कोटेशन.
8. बँकेचे खाते
9. मोबाईल नंबर
10. पासपोर्ट आकाराचे फोटो

हे पण वाचा : पीएम किसान सन्मान निधी योजना 2024:6,000रुपये वर्षाला प्रत्येक शेतकऱ्याला सरकार देणार ,तुम्ही ही अर्ज केला का ?

Udyogini Scheme 2024 साठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

1. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला जवळच्या बँकेत जावे लागेल.
2. उद्योगिनी योजनेचे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला बँकेत अर्ज करावा लागेल.
3. या योजनेचा अर्ज काळजीपूर्वक भरून आवश्यक ती सर्व कागदपत्रे त्याला जोडा.
4. अर्ज पूर्ण भरल्यानंतर बँकेत जमा करा.
5. अर्ज जमा झाल्यानंतर त्या अर्जावर पडताळणी व छाननी केली जाईल व नंतर आठ ते दहा दिवसात तुम्हाला कर्ज देण्यात येईल.
6. तुम्हाला कर्ज मंजूर झाले की त्यावर महामंडळाकडून अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते.
7. या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन ही अर्ज करू शकता पण बँकेत जाऊन अर्ज करणे हा सर्वात सोपा पर्याय आहे.

Udyogini Scheme 2024

Udyogini Scheme 2024 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

उद्योगिनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ही मुभा आहे यासाठी खालील दिलेल्या प्रमाणे अर्ज भरावा.
1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जी बँक ही योजना देते ती बँक तुम्हाला निवडावी लागेल.
2. बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावा.
3. वेबसाईटवर उद्योगिनी स्कीम शोधा आणि त्यावर क्लिक करा.
4. यानंतर एक फॉर्म ओपन होईल तो फॉर्म रिपोर्ट वाचा आणि भरा आणि नंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
5. यानंतर सी डी पी ओ तुमच्या अर्जाची पडताळणी करत आणि पुढे अर्ज पाठवेल.
6. तुमचा अर्ज जर व्यवस्थित असेल आणि बँकेला ही सर्व व्यवस्थित वाटत असेल तर तुम्हाला लगेच कर्ज देण्यात येईल.

Udyogini scheme कोणत्या बँकेत आहे?

उद्योगिनी योजना ही जिल्हा सहकारी बँक ग्रामीण बँक आरबीआय बँकेमध्ये उद्योगिनी योजना मधील लोन दिले जाते बँका खालील प्रमाणे आहेत
1. Bajaj finserv
2. Saraswat Bank
3. Punjab and Sind bank
4. Karnataka State Womens development Corporation

निष्कर्ष

उद्योगिनी योजना हि महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वालंबी बनवणे हा आहे . या योजने अंतर्गत देशातील ग्रामीण भागातील व नवीन उद्योजना ना प्रेरणा देणे हा आहे . या योजने मुले गरिबांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साह्य मिळते आणि यामुळे ते स्वतःच्या कुटुंबाचे पालन करू शकतात .

FAQ

प्रश्न . उद्योगिनी योजना 2024 साठी कोण पात्र आहे?
उत्तर . या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेला अर्ज करणारा उमेदवार स्त्री असावा व महिलेचे वय १८ ते ५५ वर्ष या दरम्यान असावे आणि वार्षिक उत्पन्न १.५ लाख रुपये पेक्ष्या जास्त नसावे . अपंग ,विधवा किंवा निराधार महिला या योजनेचा लाभ घेवू शकते याना कोणतेही कमाल मर्यादा नाही . अर्जदार हा डिफॉल्ट लिस्ट मध्ये नसावा 

प्रश्न. उद्योगिनी योजना कोणती बँक देते?
उत्तर. उद्योगिनी योजना सारस्वत बँक,पंजाब अँड सिंध बँक व बजाज फिनसर्व्ह या सारख्या बँका या योजना देतात .

प्रश्न . उद्योगिनी योजना 2024चा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?
उत्तर .उद्योगिनी योजनाचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत
महिला उदयोगिनी योजनेला केलेला अर्ज
उत्पन्न प्रमाणपत्र(उत्पनाचा दाखला )
रहिवासी प्रमाणपत्र
जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट सर्टिफिकेट)
बॅक खाते पासबुक
दारिद्रयरेषेखालील रेशन कार्ड ची झेरॉक्स
अर्जदार महिलेचे पासपोर्ट साईज दोन फोटो
अर्जदार महिलेचे आधार कार्ड
अर्जदार महिलेचा जन्म दाखला

Leave a Comment